How to identify fraud jobs advertisement of Government.

0
15
mymegabharti.in

मराठीमध्ये लेख वाचण्यासाठी:

सरकारी नोकरीच्या फसव्या जाहिराती (Fraud Jobs) ओळखण्यासाठी:

Fraud Jobs: वाढत्या स्पर्धेमुळे जॉब हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय बनलाय. त्यातल्या त्यात सरकारी नोकरी मिळवण्याचं प्रत्येकाचंच एक स्वप्न असतं. आपला शोध सुरू असतोच. मात्र सद्यस्थितीत सरकारी नोकरी मिळवणं हे काही सोपं काम राहिलेलं नाही. याच संधीचा फायदा घेत काही जण बेरोजगार तरुणांना हेरून त्यांना सरकारी नोकऱ्यांचं आमिष दाखवल जात असल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत.

नोकरीसाठी प्रयत्न करत असलेले कित्येकजण या फसव्या जाहिरातींना बळी पडतात. यामुळे आर्थिक नुकसान किंवा मग पश्चाताप होण्याची दाट शक्यता असते. जर तुम्ही देखील सरकारी नोकरीसाठीच्या जाहिराती पाहत असाल तर ती जाहिरात खरी आहे की खोटी? हे ओळखण्यासाठी खालील काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

फसव्या जाहिराती ओळखण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे:

1) सरकारी नोकऱ्यांसाठी साधारण वयोमर्यादा ही 30 ते 40 वर्षे इतकी असते. मात्र फसव्या जाहिरातीमध्ये ही वयोमर्यादा वाढवून 55 ते 60 वर्षे इतकी असते.

2) बहुदा फसव्या जाहिरातीमध्ये भरतीसाठीच्या पदांची संख्या ही वाढवून 5,000 ते 10,000 दाखवली जाते. जास्तीत जास्त लोक या फसव्या जाहिरातीच्या जाळ्यात अडकावेत म्हणून ही पदांची संख्या वाढवलेली असते.

3) बहुदा फसव्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता ही कमी असते. म्हणजेच 8वी पास, 10वी पास उमेदवारांसाठी संधी असल्याचे दाखवले जाते. (पूर्णपणे पोस्ट वर अवलंबून असते.)

4) जाहिरातीमध्ये ज्या विभागातील रिक्त पदांचा उल्लेख केला असेल. त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ही माहिती खरी आहे का? हे तपासा.

5) सरकारी विभागांच्या संकेतस्थळाच्या शेवटी nic.in किंवा gov.in असतं. मात्र फसव्या जाहिरातीमध्ये अशा कुठल्याच गोष्टीचा उल्लेख नसतो. (काही सरकारी वेब सोडले तर..) उदाहरणार्थ: ONGC India Website : https://ongcindia.com.

6) बहुतांश वेळी अश्या फसव्या जाहिरातींवर त्यांना संपर्क करण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला असतो. असे फ्रॉड आपल्याला ऑफलाईन मोड ने अधिक पाहावयाला मिळतील.

माय मेगाभरती हे संकेतस्थळ आपल्याला वेळोंवेळी नोकरीविषयक अचूक माहिती पुरवत असते. त्यामुळे आपल्या हक्काच्या या संकेतस्थळाला नियमित भेट देत राहा. आम्ही कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी आपणास देत नाही आम्ही देतो ती फक्त त्याबद्दल अचूक पारदर्शक आणि माहिती.

आपल्याला जर हा लेख आवडला असेल तर कृपया तो इतराना देखील पाठवा जेणेकरून होणारी फसवणूक थांबेल.


Topic overview in English:

How to detect Fraud Jobs:

Job has become a very intense topic for the growing competition. Everyone has a dream of getting a government job. Your search is continuing. However, there is no easy task to get a government job. Some cases have come to the fore by taking advantage of this opportunity, some people are being tempted by unemployed youth to lure them. Peoples are taking advantages of these kinds of opportunities and doing fraud with our young youth.

Many people who are trying for jobs fall prey to these fraudulent advertisements. This can lead to financial loss or there is a great chance of remorse. If you are looking for government jobs, then is that advertisement true or false? Remember to know a few things below to identify this.

Some Important points that helps yo to identify:

1) The general age limit for government Job Opportunity is 30 to 40 years. However, this age limit is increased to 55 to 60 years in fraudulent advertising. (It may vary by designations).

2) Probably the number of posts for recruitment of fraudulent advertisements is increased to 5,000 to 10,000. The number of posts is increased so that more and more people fall into the trap of fraudulent advertisements.

3) The educational eligibility of the fraudulent advertisement is probably less. This means that 8th pass, 10th pass is shown as an opportunity for the candidates. (It completely depends on the post.)

4) The section in which the vacancy is mentioned in the advertisement. Is this information correct on its official website? Check it out.

5) At the end of the government departments website, there is always nic.in or gov.in. But there is no mention of such a thing in fraudulent advertising. (There are some exemptions as well) .. For example: ONGC India Website: https://ongcindia.com.

6) Most of the time, mobile number is given to contact them on such fraudulent advertisements. The number of frauds are done using offline mode only.

MY Megabharti is one of the leading website to inform you about the latest Government jobs. We do not give any Government job for any visitor. We provide information with transparency.

Fraud Jobs

If you like these article, Do share it with your close friends and with everyone. So, We can able to reduce such kinds of Frauds.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here